अंतरगावच्या तुझी ओढ गीताची सोशल मीडियावर धूमग्रामस्थांनी वठविली कलाकारांची भूमिका
अंतरगावच्या तुझी ओढ गीताची सोशल मीडियावर धूमग्रामस्थांनी वठविली कलाकारांची भूमिका
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
---------------------------------
कोरपना - तालुक्यातील अंतरगाव येथील हौशी कलाकारांनी निर्मिलेले ' तुझी ओढ ' गीत रसिकांनी अक्षरशा डोक्यावर घेतले आहे. या गीताने यूथ टूब सह सोशल मीडियावर रसिकाच्या गळ्यातील ताईत बनले गेले आहे. शारोन अँड सांची प्रोडक्शन निर्मित ' तुझी ओढ ' हे गीत रमेश वेट्टी यांनी आपल्या सुमधुर आवाजातून स्वरबध्द केले आहे. या गाण्याला वैभव रामटेके यांचे लिरिक्स लाभले आहे. प्रज्वल भगत, अंकित वडस्कर, शिवाजी लेंनगुरे, सुरज राजूरकर, अमोल कळसकर , गजानन कोल्हे, रुपेश पानघाटे, शशिकांत बोबडे, नितीन मडावी , श्रीकांत पिंपलशेंडे, आकाश चिकाटे, प्रताप वडस्कर, मनोहर वडस्कर, स्नेहदिप खेलुरकर, स्नेहल धोटे, बजरंग मेश्राम, अंकित भोयर, अनिल नक्षिने, संकेत गुरुनूले, प्रज्वल खोब्रागडे, नितीन चिकाटे व अंतरगाव वासियानी व्हिडिओ गीतात कलाकाराच्या भूमिका वठविल्या आहे. सदर गिताचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण अंतरगाव,
सांगोडा,पकडीगुडम धरण परिसरात झाले आहे. हे गीत गुरुवार दिनाक २७ ला अंतरगाव येथे छोटेखानी प्रदर्शन कार्यक्रम घेऊन युट्युब वर प्रदर्शित करण्यात आले आहे. या व्हिडिओ गीतात प्रेमात आकांत बुडालेल्या प्रेमवीराचे तिच्या जग सोडून जाण्यानंतर ही प्रेम स्वप्न रंजन रंगविण्यात आले आहे. अत्यंत भावस्पर्शी आणि हदयाला भिडणार वास्तव चित्रण यात मांडण्यात आलेले असल्याने गीताचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून ही मन भरले जात नाही. अतिशय साजेशी कलात्मक रचना रसिकांच्या ओठाला भिडणारी ठरते आहे.
Comments
Post a Comment