सातारा:-सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांचा भ्रष्टाचार थांबवा.
सातारा:-सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांचा भ्रष्टाचार थांबवा.
--------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------
सातारा:- मागील भागात सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत बातमी लावली आहे त्याची सखोल चौकशी केली असता जी किलप समोर आली ती आम्ही प्रसारीत केली आहे. परंतु प्रसारित झालेल्या व्हिडिओ क्लिप मधील संवादानुसार झालेल्या कामाचे बरेचसे धागेदोरे आमच्या हाती मिळाले आहेत.सातारा येथे नोंद झालेली वाहने कामासाठी जर परराज्यात असतील तर त्यांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणेसाठी ते वाहन सातारा येथील कार्यालयात तपासणीसाठी आणणे गरजेचे नाही त्यासाठी कायदेशीर तरतुदींनुसार वाहने ज्या राज्यात आहेत तेथीलच जवळच्या आरटीओ कार्यालयात तपासणी करून घेता येतात.व तेथील इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी तात्पुरत्या स्वरूपात योग्यता प्रमाणपत्र प्रदान करतात.व अशी तात्पुरत्या स्वरुपाची योग्यता प्रमाणपत्र मुळ नोंदणी प्राधिकरणाला पोस्टाने पाठवतो.मुळ नोंदणी प्राधिकरण अशा प्राप्त झालेल्या तात्पुरत्या स्वरुपातील योग्यता प्रमाणपत्राची काळजीपूर्वक खातरजमा करून व त्यातील तपशीलांची खात्री करून इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी पक्क्या स्वरूपाचे योग्यता प्रमाणपत्र प्रदान करतात.पऱंतु सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मात्र वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टरचा दर्जा असलेल्या आधिकाऱ्याला बाजूला ठेवून आर्थिक लाभासाठी लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना इन्स्पेक्टर बनवून अशा प्रकारच्या कर्तव्य करण्यासाठी अधिकार त्या लिपिकाला संगणकीय प्रणालीवरती प्रदान करून त्यांच्या मार्फत पक्क्या स्वरूपाचे योग्यता प्रमाणपत्र तयार करून घेतले जाते.
त्यामुळे आर्थिक लाभासाठी वरिष्ठ अधिकारी भांडत असल्याचा व मागणीमध्ये वाढ अपेक्षित असलेल्या व्यवहाराचा लेखाजोखा व्हायरल क्लीपमधे आहे. व त्यासाठी ठरलेल्या दरापेक्षा वाढीव मागणी झाल्यामुळे वाहन मालक प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्यात वाद निर्माण झाले. व्यवहार फिसकटला व वरिष्ठ अधिकारी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे एजंट व नागरिकांना वरिष्ठ अधिकारी त्रास देत आहे म्हणून परिवहन आयुक्त व पालकमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी आमच्या चॅनलच्या प्रतिनिधी कडे एजंट व नागरिकांनी केली आहे. जनता बारिक आवाजात 'रायबाचे लग्न कधी' असे विचारत आहेत. हा रायबा कोण? वरिष्ठ साहेबांशी त्याचा काय संबंध या बद्दल सविस्तर पुढील अंकात वाचा.
Comments
Post a Comment