शेरी मळा पालखी मार्ग पाणंद रस्त्यासाठी 27 लाखाचा निधी मंजूर.

 शेरी मळा पालखी मार्ग पाणंद रस्त्यासाठी 27 लाखाचा निधी मंजूर.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

  सांगवडे ता.29 सतत सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेरी मळा पालखीचा मार्ग खूपच खराब झाला आहे. त्यामुळे चालू हंगामामध्ये त्या परिसरातील शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीस अडचण निर्माण झाल्यामुळे. गावातील  शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक सुकुमार जगनाडे, बाजीराव देसाई यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून दीड लाख रुपये गोळा करून पाणंद रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले होते; पण खर्च जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आ. ऋतुराज पाटील दादा यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली होती. त्याचा विचार करून तात्काळ पाच ते सहा दिवसांमध्ये शेरी मळा पालखी मार्ग पाणंद रस्त्याची पाहणी आ. ऋतुराज पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी स्वनिधीतून 50 हजार रुपये दिले व मातोश्री पानंद योजनेतून 27 लाखाचा निधी देण्याचे जाहीर केले. यावेळी या कामासाठी खानविलकर विकास सेवा संस्थेच्या वतीने चेअरमन दादासो घाडगे यांनी रोख 10 हजार रुपये देऊन सहकार्य केले. किरण कुलकर्णी यांनी दोन पुलांना जोडण्यासाठी रस्ता रुंदीकरणासाठी चार ते पाच गुंठे जमीन विना मोबदला दिल्याबद्दल त्यांचा आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     यावेळी ग्रा.स. विवेक चौगुले, ग्रा.स. रोहित पाटील,मा.श्री विजय पाटील,आप्पासो भेंडवडे,परशराम कोळी,श्रीधर तेली,बाजीराव देसाई,संजय उपाध्ये,दादासो घाडगे,सुकुमार जगनाडे,राजू भेंडवडे, शरणं उपाध्ये, विनोद पवार, दिनकर शिंदे, बाळगोंडा पाटील,गौतम पवार,विनायक शिर्के,उत्तम कुंभार,महेश गुरव,राजू जाधव,आदी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.