शेणगावच्या सोंगी भजन स्पर्धेतून लोककलेचा नवा अध्याय लिहिला जाईल : सरपंच सुरेश नाईक.

 शेणगावच्या सोंगी भजन स्पर्धेतून लोककलेचा नवा अध्याय लिहिला जाईल : सरपंच सुरेश नाईक.


------------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

 गारगोटी:- लोककलेचे उदात्त सादरीकरण दाखवणाऱ्या शेणगांवच्या राज्यस्तरीय सोंगी भजम स्पर्धेला नवरात्रीच्या पहिल्या रात्रीपासून सुरूवात झाली आणि गेले दोन वर्षे कोरोनामूळे थांबलेली ही लोककलेची गाडी आज पुंन्हा रुळावर आली.या स्पर्धेतून सामाजिक प्रबोधनाचा नवा अध्याय लिहिला जाईल असे भावपूर्ण उद्गार शेणगांव गावचे लोकनियुक्त सरपंच।सुरेश नाईक यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

    गावच्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी बरोबरच विविध क्षेत्रातील गावच्या मांन्यवरांनी विविध सहकार्यातून या स्पर्धेला भरभरून दिले आहे या सर्व शेणगांवच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून ही स्पर्धा पूढे चालत आली आहे.या स्पर्धेचे हे १९ वे वर्षे आहे.

  आज या रंगमंचावर लोककलावंत शिवाजी गणपती पाटील रा पंडेवाडी ता राधानगरी व आधुनिक संगीत सोंगी भजनाचे निर्माता-दिग्दर्शक सचिन लोहार सावर्डे बु ता कागल या दोन कलावंतांचा सत्कार या स्पर्धा कमिटीने करून आपली कर्तव्यता पूर्ण केली आहे.जोतिलिंग नवरात्र स्पर्था कमिटीच्या वतीने ही जबाबदारी यथार्थपणे पार पाडत लोककलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे एक चांगले माध्यम या निमित्ताने हाताळत असल्याचा आनंद आंम्हाला अधिक प्रेरणा देत असल्याचे या   स्पर्धा कमिटीचे उपाध्यक्ष रघुनाथ कुंभार यांनी व्यक्त केला. स्पर्धेसाठी योगदान देणाऱ्या दात्यांचा यथोचित सत्कार स्पर्धा कमिटीच्या वतीने करण्यात आला.

   कागल तालुक्यातील सावर्डे बु च्या आधुनिक संगित सोंगी भजनाने आपल्या सादरीकरणातून अध्यात्माची पेरणी नव्या ढंगात केली.विनोदाची झालर लावून संगतीतल्या विसंगतीवर केलेले प्रहार लक्षवेधी होते. मनोरंजनातून श्रोत्यांना अतर्मुख करणारे वास्तव अध्यात्म व प्रबोधनाच्या मुशीतून पूढे सरकताना आपण नविन काहीतरी शिकत असल्याची अनुभूती आल्याचे संयोजकांनी सांगितले.कार्याध्यक्ष या नात्याने माणसिंग तोरसे यांनी आपल्या प्रास्ताविकात ग्रामस्थांच्या हातांची गुंफण करत लोककलेचा  अविष्कार सर्वांना प्रेरणा देवून जाईल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.राजेंद्र शिंदे यांनी सुरेख सुत्रसंचालन केले.

    गणेश पुजनातून ग्रामीण समाज जीवनातले रंगेल जीवनाचे सादरीकरण विनोदाच्या शैलीतून साकारले.खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन या कॉकटेल मधून नव्या जुन्या विचाराचा सुंदर मिलाफ या भजनाने नृत्यातून सादर केला.भाजीवालीतून संत  विचाराचे दर्शन खडवले.मनावर कसलाही ताण न घेता संसारात भोळी व्हायला पाहिजे तरच कुटुंबात शांती येते असा संदेश या बाई मी भोळी या सोंगातून प्रकट केला.शिवपूजेच्या या तांडव नृत्याचे सादरीकरणातून शिवभक्तीचा.\

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.