चालू वर्षाच्या संच मान्यतेसाठी कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन पटनोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी.
चालू वर्षाच्या संच मान्यतेसाठी कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन पटनोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी.
-------------------------------------------------------------फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र कोल्हापूर
प्रतिनिधी कृष्णा कांबळे सर
----------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची मागणी
कोल्हापूर = सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता 30 सप्टेंबरच्या पटावर होते .तथापि या पटनोंदणीसाठीचे स्टुडन्ट पोर्टल आठ सप्टेंबर पासून बंद आहे .ते अद्यापही उघडलेले नाही त्यामुळे संच मान्यतेच्या पट नोंदणी संबंधातील सर्व प्रकारची कामे करणे थांबलेले आहे तसेच 30 सप्टेंबर चा पटही नोंद करता आलेला नाही त्यामुळे चालू वर्षाची संच मान्यता होणे अडचणीचे ठरले आहे
.त्यामुळे शिक्षण सचिव; महाराष्ट्र राज्य मुंबई व शिक्षण संचालक ;(प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांना निवेदन देऊन मुदतवादीची मागणी करणेत आली. या निवेदनात म्हंटले आहे की , ऑनलाईन पटनोंदणीसाठी मुदत वाढ मिळावी व सर्व जिल्ह्यांसाठी एकाच वेळी स्टुडन्ट पोर्टल ओपन करून पटनोंदणी करावया सांगण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र तारीख द्यावी, त्यामुळे ही पट नोंदणी करणे सुलभ होईल व संच मान्यता करणेही सोपे जाईल तरी स्टुडंट पोर्टल ओपन करुन पटनोंदणी करणेसमुदतवाढ द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने करण्यात आली राज्यसचिव शिवाजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूर विभागाचे सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांना भेटून हे निवेदन दिले. त्यांनी शासनाकडे हे निवेदन तात्काळ पाठविण्याची ग्वाही दिली. यावेळी राज्य सचिव शिवाजी भोसले,अरुण गोते, मुख्याध्यापक शिवाजी सोनाळकर , मुख्याध्यापक सर्जेराव नाईक ..मुख्याध्यापक अमोल गावडे व संदीप सातपुते हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment