टाकळीवाडी मध्ये कुमारी श्राव्या हिचे मोठ्या उत्साहात स्वागत

 टाकळीवाडी मध्ये कुमारी श्राव्या हिचे मोठ्या उत्साहात स्वागत.

----------------------------------------------------------------
मजरेवाडी प्रतिनिधी   
 प्रशांत पिंपळे
---------------------------------------------------------------

टाकळीवाडी तालुका:- शिरोळ येथील सौ उज्वला भरमु बदामे माजी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य विद्यमान माननीय भरमू रामू बदामे यांची  नात कुमारी श्राव्या हिचे टाकळीवाडी मध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

महेश भरमू बदामे यांना पहिलीच कन्यारत्न प्राप्त झाले.ते नाराज न होता.त्यांनी टाकळीवाडी येथील घरी मोठ्या उत्साहात स्वागत केले.आज मुली जन्मले की लोक नाराज होतात .परंतु महेश बदामे यांच्या घरी चेहऱ्यावर जरा सुद्धा दुःख दिसून येत नव्हते.  सर्वजण आनंदी होते.

हलगीच्या ठेक्यात व फटाक्याच्या आवाजात तिचे जंगी स्वागत करण्यात आले.कुमारी श्राव्या हिच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. घर अगदी आनंदाने श्राव्याच्या स्वागतामुळे भरून गेले होते.

यावेळी पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, यांनी  कौतुक केले.गावामध्ये चर्चेचा विषय ठरला. श्राव्याच्या स्वागतामुळे नक्कीच बदल घडेल.मुलगी ला सुद्धा समान वागणूक मिळेल . 

      यावेळी  गावचे सरपंच:- मंगल बिरणगे, उपसरपंच:- बाळाबाई हक्के, माजी उपसरपंच:- बाजीराव गोरे, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष माजी सुभेदार:- केंदबा कांबळे, माजी सुभेदार :-संजय बदामे, सर्व ग्रामस्थ, मित्रमंडळी, पाहुणे, गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.