कुसुंबी माईन्स तक्रारीची दखल खान सुरक्षा विभाग कडून चौकशी
कुसुंबी माईन्स तक्रारीची दखल खान सुरक्षा विभाग कडून चौकशी.
-------------------------------------------
मंगेश तिखट
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
--------------------------------------------
सातत्याने चर्चेत असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या नोकरी कुसुंबी चुनखडी खदान उत्खननाबाबत असुरक्षिततेचे तक्रार जन सत्याग्रह संघटना अध्यक्ष आबिद अली यांनी खान सुरक्षा मंत्रालय व संचालक खान सुरक्षा विभाग यांच्याकडे तक्रार केली होती चुनखडी खदानीमुळे तीव्र स्फोटकामुळे लगत असलेल्या बॉम्बेझरी लिंगनडोह कुसुंबी या गावातील नागरिकांना ब्लास्टिंग मुळे सातत्याने त्रास सहन करावा लागत होता माणिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापन नियमबाह्य या ठिकाणी वाहतुकीच्या रस्त्यावर अडथळा अनाधिकृत बांधकाम करून नागरिकांना वेठीस धरले होते यामुळे या परिसरातील आठ ते दहा गावाला जाणारा रस्त्यावरून वाटसरूंना दगडाचा मार सहन करावा लागत असे त्याचप्रमाणे खदानीच क्षेत्र हा वन क्षेत्राला लागून असल्यामुळे व सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना कंपनीने न केल्यामुळे वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात अपघात घडवून जीवाला मुकावे लागले.
अशा घटना अनेक वेळा घडल्यामुळे बिबट हरण सांबर व रानटी डुकरे च्या संख्येने मृत्यू पावले मात्र कंपनी चुनखडी उत्खननाच्या मोहात सुरक्षेचा विसर पडला याबाबतची तक्रारीची दखल घेत संचालक शानिश कुमार व उपसंचालक रवींद्र कुमार रेड्डी यांनी माणिकगड सिमेंट माईन्स कंपनीच्या खदान क्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व कंपनीच्या गेल्या अनेक वर्षापासून तपासणी मध्ये आढळलेल्या तुरटीची पूर्तता कंपनी गंभीरतेने घेत नसल्याचे निदर्शनास आले माईन्स विभागाच्या अधिकाऱ्यासह प्रत्यक्ष खदानीची पाहणी केली व तक्रारी संबंधात चौकशी करून नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल तसेच रस्त्यामध्ये झालेला फेरबदल हा महसूल विभागाचा भाग असल्यामुळे असल्यामुळे व अनधिकृत बांधकाम व रस्त्यावरील तसेच वाहतुकीकरिता निर्माण झालेला अडथळा सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीकडून आवश्यक उपाययोजना होत नसल्याचे खान सुरक्षा नियमाचे काटेकोर पालन करून नागरिकांच्या जीवाचा धोका दूर करावा व कंपनी व्यवस्थापनावर आवश्यक ती कारवाई तथा निर्देश देण्याची मागणी जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली भाऊराव कनाके गणेश सिडाम रामदास गी मंगाम यांनी केली यावेळी मोठ्या सख्येतं आदीवासी बाधीत शेतकरी उपस्थीत होते संचालक व उपसंचालक यांनी सर्व खदानी व सुरक्षेच्या उपाययोजनेचा निरीक्षण केले.
Comments
Post a Comment