Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जावली तालुक्यातील कातकरी वस्ती आखाडे व वालूथ गावामध्ये गावामध्ये लघुपट शूटिंग संपन्न.

 जावली तालुक्यातील कातकरी वस्ती आखाडे व वालूथ गावामध्ये गावामध्ये लघुपट शूटिंग संपन्न.

------------------------------------------------------------------------------------------


--------------------------------------------------------------------------------------------

जावली तालुक्यातील आखाडे व वालुथ या गावांमध्ये एका नवीन लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले या चित्रीकरणाला गावकऱ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला . रविराज वाव्होळे या लघुपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत त्याचप्रमाणे राजू गोसावी, सचिन माधव, रोहन भोसले अभिजीत भोसले, प्रतीक्षा बगाडे, अंकिता गायकवाड आधी प्रमुख भूमिकेत आहेत. व वालुथ गावातील बारा, बेलावडे गावातील दोन, आंबरळ गावातील दोन, आशा लहानशा गावातील व्यक्तींना लघुपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली व एक वेगळा अनुभव मिळाला. वालुथ गावामध्ये रोहन भोसले व अभिजीत भोसले यांच्या प्रयत्नातून दुसऱ्यांदा शूटिंग आल्यामुळे गावामध्ये फिल्म नगरीचे वातावरण निर्माण झाले. हा लघुपट वृंदावन फिल्म प्रोडक्शन च्या अंतर्गत काढण्यात आला असून या चित्रपटाचे निर्माते राजू गोसावी हे आहेत. त्यांचाही खूप मोलाचा वाटा या लघुपट मध्ये आहेत. व ते प्रमुख भूमिती आहेत. हा लघुपट नक्कीच यशाच्या मार्गावर जाणार असून अनेक पुरस्कारांसाठीही तो सज्ज होत आहे. या लघुपट मध्ये बेलावडे गावातील किरण बगाडे यांच्या मुलीने प्रतीक्षा बगाडे हिने प्रमुख भूमिका फार उत्तम प्रकारे साकारली आहे व प्रोडक्शन हेड अभिनेता लेखक संगीतकार अभिजित भोसले पाटील यांनीही फार मेहनत या लघुपटासाठी घेतली आहे. तोही आता मोठा भाऊ रोहन भोसले यांच्या पावलावर पाऊल टाकून त्याला क्षेत्रामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. वृंदावन फिल्म प्रोडक्शन, भोसले ब्रदर्स प्रोडक्शन,वालुथ गाव व जावली तालुका या कला क्षेत्रामध्ये पुढे  नेण्याचा मानस या दोघा भावांनी केलेला आहे. 

तसेच अनेक चित्रपट वेब सिरीज लघुपट मालिका या तालुक्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे. निसर्गाने नटलेल्या या जावली तालुक्याला पर्यटनाबरोबरच आता चित्रपटसृष्टीही खुणावत आहे. तसेच थोड्याच दिवसात त्यांना प्रयत्नांना यश मिळेल व अनेक चित्रीकरण या जावली तालुक्यात होऊ शकेल. सातारा जिल्ह्यातल्या नवनवीन कलाकारांना यामध्ये काम करण्याची संधी निर्माण होईल. या लघुपट मधून एक चांगला संदेश सर्वांना मिळेल व हा लघुपट अनेक पुरस्कार प्राप्त करेल अशी आशा सर्व प्रोडक्शन हाऊस टीमला आहे.

Post a Comment

0 Comments