Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

समस्याने ग्रासलेले गांधीनगर अपयशी लोकसेवक भाग 3

 समस्याने ग्रासलेले गांधीनगर अपयशी लोकसेवक भाग 3

---------------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------

गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर दारू, गोवा बनावटीची दारू, गावठी दारू, गांधीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सरनोबत वाडी कंजारभाट वस्तीमध्ये गावठी दारू बिनधास्तपणे तयार करून विकली जाते गांधीनगर चिंचवाड रोडवर असलेल्या ट्रान्सपोर्ट लाईनला गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकांच्या आशीर्वादाने गावठी दारूचा अड्डा मोठ्या दिमाखात सुरू आहे तसेच काल राज्य सीमा शुल्क विभागाने वळिवडे रोडवरील विकास माने यांच्यावर कारवाई केली बेकायदेशीर रित्या बाळगलेली दोन लाखाची दारू जप्त केली आहे,ती दारू गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकास का सापडत नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे, पंधरा ते वीस दिवसांपूर्वी उचगाव पेट्रोल पंप परिसरात झालेल्या खानावळ चालिकेच्या घरी दहा लाख रुपये सोन्याच्या चोरीचा छडा लावून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी चार ते पाच दिवसात चोरी करणाऱ्या युवतीस व सोने विकत घेणाऱ्या सराफास गजाआड केले, तर गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकांना याचा तपास का लावता आला नाही? उंचगाव वसगडे गांधीनगर मध्ये सर्व पानपट्टीवर गुटका बेकायदेशीर तीन पत्ते गांधीनगरमध्ये चालू असून गांधीनगर पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने खुलेआम चालू असून गांधीनगर पोलीस ठाण्याचे लोकसेवक दृत्तराष्ट्र राजाची भूमिका बजावताना दिसत आहे जर राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर,अन्न औषध प्रशासन विभाग कोल्हापूर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा विभाग कोल्हापूर, यांना गांधीनगर पोलीस स्टेशनच्या आवारात या गोष्टी सापडत असतील तर स्थानिक गांधीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोकळलेले अवैध धंदे गांधीनगर पोलीस ठाण्याचे लोकसेवक गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांना का सापडत नाही हे मात्र गौडबंगालच आहे. ड्राय डे दिवशी गांधीनगर मध्ये असलेल्या बार मधून चोरून दारू विकताना सापडतील परंतु 

त्यांना शोधायला लोकसेवकास वेळ नाही कि शोधायचे नाही?

गांधीनगर ठाण्यामध्ये दाखल झालेले गुन्हे किती, किती गुन्ह्यांचा तपास झाला,किती गुन्हे उघडकीस आले, याची दखल पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया सो.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे सो.अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. संकेत गोसावी यांनी घ्यावी म्हणजे गांधीनगर मध्ये पोलीस ठाण्यामध्ये किती सक्षम लोकसेवक आहेत याची माहिती आपणास मिळाल्याशिवाय राहणार नाही.

उद्याच्या अंकात पाहू ? अपयशी लोकसेवक भाग चार

Post a Comment

0 Comments