सांगलीतील डॉक्टर व्यावसायिकाचे मोटर लिलावत 12 लाखाची फसवणूक.

सांगलीतील डॉक्टर व्यावसायिकाचे मोटर लिलावत 12 लाखाची फसवणूक. --------------------------------------- मिरज तालुका प्रतिनिधी राजु कदम --------------------------------------- लिलावातून मोटार मिळवून देतो असे सांगून सांगलीतील एका नामांकित मेडिकल व्यावसायिकाची तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भिवंडी (जि. ठाणे) आणि सांगलीतील दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक महावीर काशाप्पा आलासे (वय ५५, रा. शिंदे मळा, सांगली) यांच्यासोबत घडली असून, संशयितांची नावे अनिल शिवराम कोंडा (रा. पद्मानगर, भिवंडी, जि. ठाणे) व गणेश सुरेश पाटील (रा. अरिहंत कॉलनी, सांगली) अशी आहेत. आलासे यांच्या फिर्यादीवरून संजयनगर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावीर आलासे यांची ओळख सुमारे वर्षभरापूर्वी गाड्यांची खरेदी-विक्री करणारा गणेश पाटील याच्याशी झाली होती. त्या वेळी आलासे यांनी स्वतःच्या वापरासाठी गाडी घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पाटील याने अथर्व मोटर्सचा मालक असलेल्या अनिल कोंडा याच्याकडे लिलावात गाडी उपलब्ध अ...